आंबेठाण (पुणे) – आंबेठाण ग्रामपंचायतचा कारभार आता पती-पत्नी यांच्या अधिकाराखाली चालणार आहे. येथील सरपंच संघमित्रा नाईकवाडे यांची यापूर्वी लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली होती, तर आता त्यांचे पती दत्तात्रेय नाईक नवरे यांची उपसरपंच म्हणून एकमताने निवडणूक निवड करण्यात आली.
आंबेठाण ग्रामपंचायतच्या मावळत्या उपसरपंच तुळजाबाई घाटे यांनी राजीनामा दिल्याने या पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये उपसरपंच पदासाठी दत्तात्रय पांडुरंग नाईक नवरे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
ही निवडणूक ग्राम विकास अधिकारी रवींद्र उगले यांच्या प्रशासकीय कामकाजामध्ये झाली. त्यादरम्यान निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेचे तालुका संघटक सुभाष मांडेकर, माजी सरपंच गणेश मांडेकर, शरद मांडेकर, बबन घाटे, भानुदास दवणे, दत्तात्रय चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
याप्रसंगी सभागृहात माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर, शांताराम चव्हाण, अमोल दवणे, लक्ष्मण भालेराव, रूपाली गोंडे, अहिल्याबाई पडवळ, रूपाली मांडेकर, आरती आरगडे, ज्योती मांडेकर आदी उपस्थित होते.