मुंबई – बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह त्याच्या डान्ससाठी तो अधिक ओळखला जातो. वयाच्या 49 वर्षी देखील तो एकदम फिट आहे. नुकतेच त्याने त्याचा एक शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचा हा फोटो पाहून सर्वच जण अवाक झाले आहेत.
हृतिकने सोशल मीडियावर भर उन्हात कार्डिओ वर्कआउट करताना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो शर्टलेस असून त्याने डेनिम्स जीन्स घातली आहे. त्याने पिवळ्या रंगाची टोपी आणि चष्मा घातलेला आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा तुम्हाला लवकर वजन कमी करणे आवश्यक असते, तेव्हा व्हिटॅमिन ‘डी’ (धूप)पेक्षा काहीही उत्तम काम करत नाही!’
When you need to shred fast, nothing works better than vitamin D’hoop! 😌
Soak it in before the yellow turns blue. #keepgoing pic.twitter.com/r9lN7j2Tim
— Hrithik Roshan (@iHrithik) June 14, 2023
या पोस्टवर हृतिकने ‘कोई मिल गया’ चित्रपटातील ‘जादू’ची आठवण करून दिली आहे. या चित्रपटात एनर्जीसाठी जादूला धूप अर्थात उन्हाची गरज असते. दरम्यान, सध्या हृतिक त्याच्या आगामी ‘फायटर’साठी शूटिंग करत आहे. तो या चित्रपटासाठी कठोर प्रशिक्षण घेत आहे. यात तो पहिल्यांदाच वायुसेनेच्या अधिकाऱ्याची भूमिका करताना दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही भूमिका आहेत. जानेवारी 2024 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.