मुंबई – “बिग बॉस-14′ मधील निकी तांबोळीने यापूर्वी “खतरों के खिलाडी’ मध्येही भाग घेतला आहे. आता मात्र रिऍलिटी शो ऐवजी आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करायचे ठरवले आहे. तिच्या वाट्याला तशी संधी देखील चालून आली आहे.
सर्व प्रकारच्या सिनेमांमध्ये काम करून स्वतःला सिद्ध केलेल्या एका ऍक्टरबरोबर तिला हा सिनेमा मिळाला आहे, असे समजते आहे. निकीने या नवीन सिनेमाचे शूटिंग आणि “खतरों के
खिलाडी’साठीची रिहर्सलदेखील एकाचवेळी सुरू केली आहे. तिच्या वाट्याला आलेल्या या सिनेमाबाबत अजून सविस्तर माहिती मिळालेली नाही.
“बिग बॉस’मध्ये निकी खूप तडातडा बोलणारी म्हणून प्रसिद्ध झाली होती. फायनलपर्यंत पोहोचणाऱ्या स्पर्धकांपैकी ती एक होती. 2019 मध्ये निकीने “कंचना 3′ या तमिळ सिनेमातही
काम केले होते. त्यावर्षी तमिळमध्ये सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा तो सिनेमा ठरला होता. निकीने आतापर्यंत एक तमिळ आणि दोन तेलगू सिनेमातही काम केले आहे.