Pakistan : पाकिस्तानमध्ये पुढील महिन्यात 8 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनी किमान 5 टक्के महिला उमेदवार देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानंतर पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बुनेर मतदारसंघातून पहिल्या हिंदू उमेदवार म्हणून डॉ. सविरा प्रकाश यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
डॉ. सविरा या पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याक आहेत. 25 वर्षीय सविरा या डॉक्टर असून त्यांनी गेल्या आठवड्यात बुनेर जिल्ह्यातील PK-25 सर्वसाधारण जागेसाठी पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) कडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पाकिस्तानात हिंदूंव्यतिरिक्त शीख आणि ख्रिश्चनांचाही अल्पसंख्याकांमध्ये समावेश होतो. पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी अल्पसंख्याक २० टक्क्यांहून अधिक होते. मात्र आता ही संख्या ३ टक्क्यांवर आली आहे.
पाकिस्तानमध्ये तीन मोठे पक्ष आहेत, जे नेहमी सत्तेच्या आसपास राहिले आहेत. त्यामुध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय), पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी). डॉ. सविरा प्रकाश खैबरमधून पीपीपीच्या उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरल्या आहेत. पेशाने डॉक्टर असलेल्या सविरा यांचे वडीलही राजकारणात होते. आता पाकिस्तानातील पहिल्या हिंदू उमेदवार म्हणून डॉ. सविरा प्रकाश यांच्याबाबत अधिक माहिती जाऊन घेऊयात.
कोण आहे डॉ. सविरा प्रकाश?
साविरा यांचे वडील ओम प्रकाश हे डॉक्टर आहेत आणि नुकतेच ते निवृत्त झाले आहेत. ओम प्रकाश गेल्या 35 वर्षांपासून पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सदस्य आहेत. सवीरा स्वतः एक डॉक्टर आहे आणि त्यांनी 2022 मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. बुनेरमधील पीपीपी पक्षाच्या महिला विंगच्या सरचिटणीसही सविरा राहिल्या आहेत. सवीराला महिलांची स्थिती सुधारून त्यांच्यासाठी चांगले वातावरण निर्माण करायचे आहे.
तसेच, सवीरा म्हणते की ती जर निवडणुकीत जिंकली तर ती गरीब आणि वंचितांसाठीही काम करेल. एक डॉक्टर म्हणून सरकारी रुग्णालयातील खराब व्यवस्थापन पाहून तिला व्यवस्था सुधारण्याची गरज वाटली आणि त्यामुळेच तिने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
बुनेरमध्ये 55 वर्षांत प्रथमच एक महिला उमेदवार निवडणूक लढवणार
55 वर्षांत प्रथमच एक महिला उमेदवार बुनेर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. जिथून सवीराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाकिस्तानमध्ये नामांकनाची अंतिम तारीख 24 डिसेंबर होती आणि तेथे 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.