गुजरात – गुजरातमधील कच्छमधील एका खासगी शाळेत ईदच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर गदारोळ झाला होता. यावर आता असदुद्दीन ओवेसी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
कच्छ – मुंद्रा के पर्ल स्कुल में बकरीद के दिन हिन्दु बच्चों को गोल टोपी लगाकर नमाज़ पढ़वाने पर @vhpgujofficial ने किया उग्र विरोध। तत्काल स्कुल प्रबंधन समिती पर कड़क कार्यवाही करने की मांग के बाद जिल्ला शिक्षा विभाग ने दिए जांच के आदेश।@drskj01 @Sadhvi_prachi@dgpgujarat… pic.twitter.com/HNfG8A1O0G
— Hitendrasinh Rajput (@TheHitendrasinh) June 30, 2023
नुकताच बकरीदच्या निमित्ताने गुजरातमधील कच्छमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये हिंदू मुले टोप्या घालताना दिसत होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. याला विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्षेप घेतला, त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले. यावर आता AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
ट्विट केले आहे की, “कच्छमधील एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले कारण व्हिडिओमधील मुले ईदच्या दिवशी खेळत होती आणि टोप्या घातल्या होत्या.” पीएमओ इंडियाच्या ट्विटर हँडलला टॅग करत त्यांनी पुढे लिहिले, “पीएमओ इंडिया टोप्या घालू शकत नाही कारण ते नीच कृत्य आहे. कदाचित हिंदुत्व यूसीसीचे आणखी एक कारण असेल?” असं म्हणत मोदी सरकार टीका केली आहे.