23 किलो वजनाची झाडे जप्त : जेजुरी पोलिसांची कामगिरी
जेजुरी- जेजुरी पोलीस ठाण्याअंतर्गत जवळार्जून (ता. पुरंदर) येथे उसाच्या पिकात 23 किलो वजनाची सुमारे 19 गांजाची झाडे जेजुरी पोलिसांनी जप्त केली आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी महेश शामराव पवार (रा. जवळार्जून) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पवार यांनी त्याच्या गट नंबर 740 मधील उसाच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस पथकाने उसाच्या पिकाची पाहणी केली असता त्यांना 23 किलो वजनाची लहान-मोठी सुमारे 19 झाडे मिळून आली. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहायह पोलीस निरीक्षक अंकुश माने, सहायक फोजदार शिवाजी खोकले, गणेश दाभाडे, संतोष अर्जुन, संतोष मेढेकर, संदीप कारंडे, अक्षय यादव, धर्मवीर खाडे, गणेश कुतवळ, अतुल मोरे, प्रवीण शेंडे, के. एच. तुपे, ए. बी. राऊत आदी सहभागी झाले होते.