निमोणे -करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण आहे. याचाच गैरफायदा घेत सध्या शिरुर तालुक्याच्या पूर्व भागात अवैध गावठी दारु विक्री जोरात सुरू आहे.
निमोणे, गुनाट, शिंदोडी या परिसरात काही लोक किराणा दुकानात तसेच स्वतःच्या घरात दारू विक्री करत असल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागात ढाबे बंद असल्यामुळे छुप्या पद्धतीने दारूविक्री सुरू आहे. निमोणे-शिंदोडी रोडवर एका घरात गावठी दारु विक्री चालते.
त्यामुळे संध्याकाळी तिथे मोठ्या मद्यपी लोकांची गर्दी असते. त्यामुळे पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.