मुंबई – मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या जामीन अर्जावर उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे.
गॅंगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथिदारांचा सहभाग असलेल्या जमीन खरेदी प्रकरणी मलिक यांनी कुर्ला येथे मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे.
याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत फेब्रुवारीत त्यांना अटक केली होती. विशेष न्यायालयात मलिक यांनी वैद्यकीय कारणांमुळे जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज फेटाळण्यात आल्याने मलिक यांच्या वतीने आज उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला. या अर्जावर न्या. मकरंद कर्णिक यांच्यासमोर उद्या, मंगळवारी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.