30 ग्रामपंचायतींना तहसीलदार रमा जोशी यांची सुचना
मंचर-आंबेगाव तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ग्रामसभा घेऊन प्रभागनिहाय आरक्षण व सोडती काढण्याची सुरुवात शुक्रवार (दि. 24) पासून झाली आहे. ही प्रक्रिया सोमवार (दि. 3) फेब्रुवारीपर्यंत पुर्ण होणार असून संबधित 30 ग्रामपंचायतींना दिलेल्या वेळापत्रकानुसार ग्रामसभा घेण्याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती तहसिलदार रमा जोशी यांनी दिली.
जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम महसूल विभागाने जाहीर केला आहे. यामध्ये काळेवाडी-दरेकरवाडी, कोलदरा-गोनवडी, धोंडमाळ-शिंदेवाडी, कोळवाडी, कोटमदरा, चिंचोली, गिरवली, लांडेवाडी-पिंगळवाडी, थुगांव, शेवाळवाडी, एकलहरे, वडगाव काशिंबेग, पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे, पेठ, अवसरी खुर्द, कारेगाव, मंचर, शिंगवे, वळती, भागडी, खडकी, लौकी, महाळुंगे पडवळ, साकोरे, जवळे, भराडी, शिरदाळे, खडकवाडी, रानमळा व गावडेवाडी या ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीसाठी संबधित ग्रामसेवक, तलाठी व मंडलाधिकारी योगेश पाडळे, सुनील नंदकर, एस. एम. पवार यांची नियुक्ती केली आहे. 24 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत ग्रामपंचायतींनी सकाळी 10 वाजता विशेष सभेचे आयोजन करुन प्रक्रिया पुर्ण करण्याच्या सुचना तहसीलदार रमा जोशी यांनी दिल्या आहेत.