नवी दिल्ली – भारतीय संघाच्या माजी दिग्गज ऑफस्पिनरने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकवर (Inzamam ulhuk) आपला राग काढला आहे. इंझमाम उल हकचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये इंझमामने हरभजन सिंगने केलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख केला आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हरभजनने (harbhajan singh) इंझमामला सडेतोड उत्तर दिले आहे.
भज्जीने त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावर इंझमामने केलेल्या वक्तव्याचा खंडन केले आणि म्हटले की त्याला त्याच्या राष्ट्रीयत्वाचा आणि धार्मिक ओळखीचा अभिमान आहे. इंझमाम उल हकच्या व्हिडिओला उत्तर देताना भज्जीने लिहिले, “तो कोणती नशा करून बोलत आहे,भारतीय आणि शीख असल्याचा मला अभिमान आहे. हे लोक काहीपण बकवास बोलतात” असं उत्तर हरभजनने यावेळी दिल आहे.
असा किस्सा इंझमाम उल हकने सांगितला
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये इंझमाम उल हकने म्हटले आहे की, हरभजन सिंग हा त्या भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक होता जो मौलाना तारिक जमीलच्या प्रवचनाला जात असे. जमील पाकिस्तान क्रिकेट संघासोबत नमाज अदा करण्यासाठीही ओळखले जात होते. माजी कर्णधाराने सांगितले की एका दौऱ्यात त्याने इरफान पठाण, झहीर खान आणि मोहम्मद कैफ यांना प्रार्थना सत्रात सामील होण्यासाठी आमंत्रित केले आणि हरभजन सिंगनेही त्यात भाग घेतला.
Yeh kon sa nasha pee kar baat kar raha hai ? I am a proud Indian and proud Sikh..yeh Bakwaas log kuch bi bakte hai 😡😡😡🤬🤬 https://t.co/eo6LN5SmWk
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 14, 2023
इंझमाम उल हक असेही म्हणाले की हरभजन सिंग तारिक जमीलच्या उपदेशाने खूप प्रभावित झाला आणि त्याने असं म्हंटल कि मला वाटत मी मौलानांच ऐकावं. इंझमामचा या संबंधीचा एक व्हिडीओ देखील यापूर्वी व्हायरल झाला होता. मात्र आता हरभजनने त्याला सडेतोड उत्तर दिल आहे.