पुणे – व्याजाने घेतलेल्या पैशासाठी एकाचे अपहरण करून शिरूर वरून पुण्यात आणून डांबून ठेवत 50 लाखांची खंडणी किंवा 5 एकर जमीन कागदोपत्री नावावर करून मागणार मागणार्या सहा जणांना खंडणी विरोधी पथक 1 ने सहा जणांना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पुणे शहर पोलिस दलातील एकाचा देखील सहभाग आहे.
अनिल लक्ष्मण हगवणे (33, रा. संभाजीनगर, हगवणे), किरण सोपान भिलारे (35, रा. भिलारेवाडी, कात्रज), विशाल अनिल जगताप (22, भिलारेवाडी कात्रज), संदीप चंद्रकांत पोखरकर (24, धनकवडी), अभिजित दत्तात्रय देशमुख (29, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि पोलिस शिपाई मनोज ज्ञानेश्वर भरगुडे (32, रा. ज्ञानेश्वरी अपार्टमेंट, आंबेगाव पठार, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत टाकळी हाजी येथील एका तरुणाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिल्यानंतर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.