जोहान्सबर्ग – भारतीय वंशाच्या राजेश आणि अतुल गुप्ता या दोन बंधूंना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दुबईत अटक करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांना ज्या प्रकरणावरून हटवण्यात आले होते, त्या प्रकरणी हो दोघेही “मोस्ट वॉन्टेड’ संशयित होते. दुबई पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
राजेश गुप्ता (वय 51 वर्षे) आणि अतुल गुप्ता (वय 53 वर्षे) यांच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. झुमा यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीदरम्यान गुप्ता कुटुंबातील 3 बंधूंपैकी दोघांनी सरकारी मालकीच्या कंपनीतून अब्जावधी रॅन्ड (स्थानिक चलन) ची लूट करून आपल्या कुटुंबीयांसमवेत दक्षिण आफ्रिकेतून पळ काढला होता. दक्षिण आफ्रिकेतील मनी लॉन्डरिंग आणि गुन्हेगारी आरोपांवरून राजेश आणि अतुल गुप्ता या दोघा बंधूंना अटक करण्यात आली आहे, असे दुबई पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
इंटरपोलकडून या दोघांबद्दलची रेड कॉर्नर नोटीस मिळाल्यानंतर दुबई पोलिसांनी या दोघांना अटक ककेली आहे. या दोगांना दक्षिण आफ्रिकेत परत पाठवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेबरोबर समन्वय साधला जात असल्याचेही दुबई पोलिसांनी म्हटले आहे. मात्र या बंधूंपैकी अजय गुप्ता या तिसरया बंधूला अटक करण्यात आली आहे की नाही, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
झुमा यांच्यासी निकटचे संबंध…
झुमा हे 2009 ते 2018 दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होते. सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून त्यांना राजीनामा द्यायला लागला होता. सरकारी व्यवस्थेत मोठा भ्रष्टाचार झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास झाला होता. उच्च पदांवरीन नियुक्त्यांसाठी झुमा यांच्या वशिल्याचा उपयोग करून घेतल्याचा आरोप गुप्ता बंधूंवर आहे. 2018 मध्ये सरकारी संस्थांमधून अब्जावधी रॅन्डचा अपहार केल्यानंतर गुप्ता कुटुंबीय दुबईमध्ये पळून गेले होते. भ्र÷टाचाराच्या प्रकरणांमुले गुप्ता बंधूंना ब्रिटन आणि अमेरिकेनेही फरार आरोपी घोषित केले होते.
प्रत्यार्पणासाठी मोठा खटाटोप…
झुमा यांना हटवून सिरील सामफोंसा यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले तेंव्हाच गुप्ता बंधूंनी दक्षिण आफ्रिकेतून पळ काढून दुबईमध्ये आश्रय घेतला होता. 2019 मध्ये अमेरिकेने गुप्ता बंधूंना भ्रष्टाचारी नेटवर्कचे सदस्य म्हणून घोषित केले आणि त्यांच्यावर निर्बंधही घातले होते. संयुक्त अरब अमिरातीतील गुप्ता बंधूंचा ताबा मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने संयुक्त राष्ट्राशीही संपर्क साधला होता. मात्र तेंव्हा दोन्ही देशांमध्ये गुन्हेगार प्रत्यार्पण करार झालेला नव्हता. त्यामुळे गुप्ता बंधूंचे हस्तांतरण होऊ शकले नव्हते. मात्र जून 2021 मध्ये या प्रत्यार्पणाच्या कराराला मंजूरी मिळाली. त्यानंतर लगेचच गुप्ता बंधूंना ताब्यात घेम्याची प्रक्रिया सुरू झाली.