राजगुरूनगर (पुणे)- करोनाच्या महामारीतून अद्याप नागरिक सावरले नसताना काही शाळांनी विद्यार्थी व पालकांकउून फी भरण्यासाठी तगादा लावला आहे. अशा शाळांना खेडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सज्जड इशारा दिला आहे.
खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागातंर्गत 35 केंद्रांतर्गत 23 केंद्रातील 54 शाळा सुरु झाल्या आहेत. इंग्रजी माध्यमिक शाळा सुरु होत आहेत. काही शाळांमध्ये मुलांच्या ऑनलाइन शिक्षणाला ब्रेक लावून फीसाठी शाळा व संस्थेकडून तगादा लावल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्यामुळे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी शाळा व्यवस्थापनाला नोटीस काढून कारवाई करण्याचा सज्जड इशारा दिला आहे. लॉकडाऊनमुळे अजूनही काही पालक सावरले नाहीत तोच शाळा, संस्थाचालक फी वसुलीसाठी पालकांकडे मागणी करीत असल्याने मुलांच्या शिक्षणापेक्षा शाळा फी कशी भरायची, याची भ्रांत पडली आहे.