भोर- संपूर्ण देश आणि राज्यात लॉकडाऊन असल्याने रोजंदारी कामगार, मोलमजुरी करणारे गवंडी, आदिवासी, तसेच भूमिहीन व धुण्याभांड्याची कामे करणाऱ्या लोकांचे हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होऊ नये म्हणून भोर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातर्फे सोमवारी (दि. 27) भोर शहर आणि परिसरातील 40 गरजू कुटुंबांना 12 जीवनावश्यक साहित्य असलेल्या किटचे वाटप भोर न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश समाधान मुळे, न्यायाधीश पराग आवटे व न्यायाधीश हर्षदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भोर न्यायालय व न्यायालयीन कर्मचारी यांच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे किट सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन न्यायालयाचे आवारात वाटप करण्यात आले. यावेळी न्यायालयाचे अधीक्षक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.