नवी दिल्ली – येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर सध्या 4300 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी आहेत. त्यामुळे ते चर्चेत होते. मात्र आता राणा कपूर हे त्यांच्या पत्नीकडून नातवाला देण्यात आलेल्या महागड्या गिफ्टमुळं चर्चेत आले आहेत.
राणा कपूर यांच्या पत्नी बिंदू राणा कपूर यांनी त्यांचा 9 महिन्यांचा नातू आशिव खन्नाला 40 कोटी रुपयांची प्रॉपर्टी गिफ्ट केली आहे. ही प्रॉपर्टी दिल्लीतील मोक्याच्या जोरबाग परिसरात आहे. मनीकंट्रोलच्या बातमीनुसार, Zapkey.com द्वारे दिलेल्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स हे उघड झालं आहे.
दरम्यान नातवासाठीची प्रॉपर्टी 31 जुलै 2021 रोजी रजिस्टर केली गेली आहे. हे गिफ्ट डीड म्हणून रजिस्टर्ड आहे. यासाठी राणा कपूरच्या पत्नीने 36.90 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. राणा कपूर यांच्या पत्नीला आपल्या वडिलांच्या संपत्तीतून वारस हक्काने एक भाग मिळाला होता.
गिफ्टमध्ये दिलेली ही प्रॉपर्टी दक्षिण दिल्लीच्या जोरबाग भागात आहे. तळमजल्यावर 2 BHK फ्लॅट असून पार्किंग स्लॉट आणि इतर काही सुविधाही आहेत. फ्लॅटचे क्षेत्रफळ 369 चौरस मीटर आहे. प्रॉपर्टीचे अंदाजे बाजार मूल्य सुमारे 40-44 कोटी रुपये आहे.
दरम्यान गिफ्ट मिळालेल्या नातवाचे आजोबा राणा कपूर यांच्यावर 4300 रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी इतर लोकांना येस बँकेच्या मदतीने मोठ्या प्रमाणात कर्ज दिले. या बदल्यात मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याचा आरोप आहे.