World Masters League : सध्या भारतातील क्रिकेटप्रेमींमध्ये आयपीएलचा उत्साह पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये चाहत्यांना जगभरातील क्रिकेटपटू वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळताना दिसतात. आता IPL प्रमाणेच आणखी एक T20 क्रिकेट लीग वर्ल्ड मास्टर्स लीग T20 सुरु होणार आहे. या क्रिकेट लीगमध्ये जगभरातील माजी दिग्गज क्रिकेटपटू चाहत्यांसाठी खेळताना दिसणार आहेत. या लीगमध्ये चाहत्यांना भरपूर मनोरंजन पाहायला मिळणार आहे. मात्र, या लीगसंदर्भातील संघांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.
हे क्रिकेटपटू या लीगमध्ये घेणार भाग…
भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, इंग्लंड यांसारख्या देशांतील माजी क्रिकेटपटू वर्ल्ड मास्टर्स लीग T20 मध्ये खेळताना दिसणार आहेत. ज्यामध्ये माजी भारतीय क्रिकेटर सुरेश रैना, वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी, थिसारा परेरा, ड्वेन स्मिथ यांसारखे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरून आपला जलवा दाखवणार आहेत. या लीगसाठी स्पर्धेचे वेळापत्रक, ठिकाण आणि फ्रँचायझींची नावे लवकरच जाहीर केली जातील. या लीग दरम्यान 6 संघ 19 सामने खेळणार आहेत.
USA-based businessman Muhammad Kamran Awan is keen to acquire a franchise in the World Masters T20 League after his experience in the US Masters T10 League@WMLT20official #WMLT20 pic.twitter.com/gJ43ZmvaRP
— WORLD MASTERS LEAGUE T20 (@WMLT20official) April 11, 2024
वर्ल्ड मास्टर्स लीग T20 आयोजकांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आमचे उद्दिष्ट T20 क्रिकेटमधील माजी दिग्गजांचा वारसा कायम ठेवण्याचे आहे. ही केवळ स्पर्धा नसून क्रिकेटवर आपली छाप सोडणाऱ्या दिग्गजांना श्रद्धांजली आहे.
भारतीय संघाकडून खेळलेल्या खेळाडूंसोबतच देशांतर्गत क्रिकेटचे काही माजी खेळाडूही यात सहभागी होणार असून त्यांनी ड्राफ्टमध्ये आपली नावे नोंदवली आहेत. जेसल कारिया, बिपुल शर्मा, अमितोज सिंग, अनुरीत सिंग, अभिमन्यू मिथुन, ईश्वर चौधरी आणि रॉबिन बिस्ट यांनी वर्ल्ड मास्टर्स लीग T20 ड्राफ्टसाठी साइन अप केले आहे.