Neeraj Chopra : संपूर्ण देशात सध्या गरबा खेळण्याचा आनंद साजरा केला जात आहे. कारण मागील दोन वर्षांपासून देशात कोरोनाचे संकट असल्याने गरबा खेळण्यावर पूर्णपणे निर्बंध लावण्यात आलेले होते. मात्र यंदा गरब्यावर कोणत्याही प्रकारचे नियम किंवा अटी लावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिक मोठ्या उत्साहाने गरबा खेळण्याचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. गरब्याची आवड ही फक्त सेलिब्रिटींनाच नव्हे तर खेळाडूंनाही असते. याची एक झलकही गुजरातमध्ये पाहायला मिळाली आहे.
भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखला जाणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Neeraj Chopra ) याने गरब्याचा मनसोक्त आनंद लुटला आहे. गुजरातमध्ये येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने अनेक आजी-माजी खेळाडू दाखल झाले आहेत. स्पर्धेचे उदघाटन गुरुवार पासून होणार आहे, त्यामुळे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नीरज चोप्राही तेथे पोहोचलेला आहे. यावेळी त्याने बुधवारी शहरातील काही ठिकाणी कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती.
नवरात्रीच्या काळात गुजरातमध्ये सर्वत्र गरब्याचा माहोल पाहायला मिळतो. अशा वेळी प्रत्येकाला गरबा खेळण्याची ओढ निर्माण होते. नीरज चोप्राच्या ( Neeraj Chopra ) बाबतीत देखील हेच पाहायला मिळाले. बडोदा येथील एका गरबा कार्यक्रमात नीरज चोप्राला मोह आवारात आला नाही आणि त्याने गरब्यावर चांगलाच ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नीरज चोप्राने तेथील उपस्थित नागरिकांशी गुजराती भाषेत संवादही साधला. त्याचा गरब्यावरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ( Golden boy Neeraj Chopra enjoyed Garba in Vadodara at national Games 2022 )
#WATCH गुजरात: ओलंपिक में स्वर्ण पदक विजेता खिलाड़ी नीरज चोपड़ा नवरात्रि के अवसर पर वडोदरा में आयोजित एक कार्यक्रम में पहुंचे। इस दौरान उन्होंने गरबा भी किया। (28.09) pic.twitter.com/nkgzpf45Kt
— ANI_HindiNews (@AHindinews) September 29, 2022
नीरज चोप्राने ( Neeraj Chopra ) टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले होते. तेव्हा त्याच्या नावाची चर्चा संपूर्ण देशभरात झाली. लहान-मोठ्यापासून सगळ्यांनाच त्याचे नाव माहिती झाले. त्यावेळी त्याचे विविध क्षेत्रांतून भरभरून अभिनंदन करण्यात आले होते. आगामी काळात होणाऱ्या आशियाई स्पर्धेत नीरज चोप्रा त्याच्या चाहत्यांना मैदानात पाहायला मिळणार आहे.