नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात कमी झाल्यानंतर भारतीय बाजारातही या दोन धातूच्या दरामध्ये घट नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 212 रुपयांनी कमी होऊन 49,827 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 480 रुपयानी कमी होऊन 63,329 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,893 डॉलर व चांदीचा दर 23.78 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पाटेल यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत.