पुणे- दिवे घाटामध्ये दुचाकी घसरून एकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सासवड रोडने हडपसरकडे येणार्या रोडवर दिव घाटातील तिसर्या वळणावर घडली. नानासाहेब जय’वंत औताडे (47, रा. औताडेवाडी, जि.पुणे) असे अपघाती मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलिस नाईक सागर किसन वणवे यांनी याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानासाहेब आणि त्यांची पत्नी मंगल साहेब औताउे हे त्यांच्या दुचाकीवरून दिवे घाटातून घरी निघालेले असताना दि. 3 फेब्रुवारी रोजी त्यांच्याी दुचाकी दिवे घाटातील तिसर्या वळणावर घरसली.
या अपघातात नानासाहेब यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर मंगल यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नानासाहेब यांचा अपघाती मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बिडवे करीत आहेत.