नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत असल्यामुळे आणि रुपयाचे अवमूल्यन होत असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरामध्ये शुक्रवारी मोठी घट नोंदली गेली. दिल्ली सराफात चांदीचा दर 1,105 रुपयांनी कमी होऊन 61,652 रुपये प्रति किलो झाला.
सोन्याचा दर 423 रुपयांनी कमी होऊन 47,777 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. काल जागतिक वायदे बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यामुळे त्या प्रमाणात भारतीय बाजारांमध्ये सोन्याचे दर कमी होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपण पटेल यांनी सांगितले.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,794 डॉलर व चांदीचा दर 22.63 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. अमेरिकेत व्याजदर वाढीची घोषणा करण्यात असल्यामुळे कर्जरोख्यावरील परतावा वाढला आहे. त्याचबरोबर डॉलर बळकट झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे विश्लेषक नवनीत दमानिया यांनी सांगितले.