रेडा- फिट इंडिया या केंद्र सरकारच्या मोहिमेअंतर्गत “गो गर्ल गो’ ही स्पर्धा नुकतीच इंदापूर तालुका क्रीडा संकुलात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत तालुक्यातील बहुसंख्य शाळांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा तीन वयोगटातमध्ये घेण्यात आली. यातील विजजी स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून जिल्हास्परीय स्पर्धा शनिवारी (दि. 29) पुण्यात पार पडणार आहे.
दरम्यान, तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सदस्य महेंद्र रेडके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गट विकास अधिकारी विजय परीट, कुस्ती कोच पै. मारुती मारकड, तालुका क्रीडा अधिकारी सुहास व्हनमान, सदाशिव सावंत, तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरद झोळ उपस्थित होते. स्पर्धेत पंच म्हणून व्ही. टी. जाधव, नानासाहेब नलावडे,सागर बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन सुनिल मोहिते यांनी केले.
वयोगटापनुसार विजयी विद्यार्थिनी (शाळा) पुढीलप्रमाणे; वयोगट 6 ते 9 वर्षे : राजश्री शिंदे (श्री नारायणदास रामदास प्राथमिक शाळा), मानसी तनपुरे एलजी बनसोडे (पळसदेव), गायत्री शिंदे (प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल). वयोगट 10 ते 13 वर्षे : सिद्धी पवार, प्राची चंदनकर, तृप्ती मगर (तिघे जिजामाता विद्यालय सराटी). वयोगट 14 ते 18 वर्षे : सिमरन निंबाळकर (जिजामाता विद्यालय सराटी), साक्षी क्षीरसागर (श्री छत्रपती हायस्कूल, भवानीनगर), शिवानी सुर्वे (श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम).