वाघोली – बहीण-भावांचं अतूट प्रेम आणि नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन. याच सणाच्या निमित्ताने वाघोलीतील संपत गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना दोन तोळ्यापेक्षा जास्त वजनाची सोन्याची राखी अर्पण केली आहे.
वारकरी मंडळी ज्ञानेश्वर माऊलींना आपला देव, माय, बाप, बहीण, भाऊ अस सर्व काही मानतात. अशा आपल्या बंधू स्वरूप ज्ञानेश्वर माऊली प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाघोली येथील संपत गाडे या वारकरी कुटुंबीयांनी सोन्याची राखी ज्ञानेश्वर माऊलीला अर्पण करुन रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे.
ज्ञानेश्वर माऊलीविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपत गाडे ह्या वारकरी कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना सोन्याची राखी अर्पण करुन रक्षाबंधन सण साजरा केला आहे. त्याचबरोबर देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांची देखील ज्ञानेश्वर माऊलींनी रक्षा करावी अशी प्रार्थना गाडे कुटुंबीयांनी या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी केली आहे.