पिंपरी, (प्रतिनिधी) – आत्ताच जेलमधून आलो आहे. तुम्हाला येथे धंदा करायचा आहे तर दर महिन्याला मला हप्ता द्या नाहीतर जीवे मारेल, अशी धमकी देणाऱ्य गुंडाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 18 फेब्रुवारी रोजी साने चौक, चिखली येथे घडली.
अस्लम बशीर मुजावर (रा. चिखली) असे अटक आरोपीचे नाव आहे. शिवाजी गंगाधर उनवने (वय 40 रा. चिखली) यांनी मंगळवारी (दि. १२) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे साने चौक येथे क्लासिक मेन्स वेअर हे कपड्याचे दुकान आहे. आरोपी दुकानात आला व त्याने फिर्यादीला म्हणाला की, मी आत्ताच जेलमधून बाहेर आलो आहे.
मी साने चौकाचा भाई आहे. तू येथे खूप कमावलेस. आता तू मला 10 हजार रुपये दे आणि दर महिन्याला एक हजार रुपये दे, अशी मागणी केली. तसेच हप्ता दिला नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या शेजारी असलेल्या ज्यूस सेंटर चालकाला देखील धमकावून दर महिन्याला 3 हजार रुपयांचा हप्ता मागितला.