भवानीनगर – गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2023) दहा दिवसाच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वालचंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे भवानीनगर (Bhavani Nagar) व्यापारपेठ मध्ये मंगळवारी (दि. 19) रूट मार्च( पथ संचालन) (Police Route March) करण्यात आले.
आज श्री गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाचे आगमन झाले. पुढील दहा दिवस गणेशोत्सव साजरा होत असल्याने या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच बंदोबस्ताच्या अनुषंगाने वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मिठ्ठापल्ली तसेच पोलीस व होमगार्ड यांनी संपूर्ण व्यापार पेठमधून सशस्त्र संचलन केले.
यावेळी वालचंद नगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. या काळामध्ये काही अनुचित घटना घडू नयेत याची अगोदरच खबरदारी घेण्यासाठी व नागरिकांनी कायदा सुव्यवस्था पाळण्यासाठी पोलिसांनी भवानीनगर मधील व्यापार पेठ मधून रूट मार्च काढला होता.