वाघोली – आव्हाळवाडी तालुका हवेली येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारिणीचे सदस्य गणेश कुटे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा राज्य सचिव पदी निवड झाली असून निवडीचे पत्र भाजप युवा मोर्चा राज्याचे अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांनी कुटे यांना दिले आहे.
हवेली तालुका भाजपचे दोन वेळा अध्यक्ष पद भूषवणारे कुटे हे राजकीय घडामोडींचे साक्षीदार असून जिल्ह्यातील सर्वात मोठा भाजप पक्ष प्रवेश सोहळा कुटे यांच्या काळात संपन्न झाला आहे. पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदावर देखील कुटे यांनी कामकाज करून पक्षाची प्रतिमा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे. राज्य कार्यकारिणी युवा मोर्चाचे सदस्य झाल्यापासून विक्रांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे संघटन करून राज्यभर दौरे करून भाजपची युवा पिढी संघटित करण्यासाठी कुटे यांनी कार्य केले आहे. हवेली तालुक्यातून राज्याच्या युवा मोर्चा कार्यकारिणीवर सचिव पदाचा मान मिळवणारे कुटे एकमेव पदाधिकारी ठरले आहे.
महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या हस्ते गणेश कुटे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी अविनाश कुटे, विशाल कुटे, तुषार कुटे,मनोज कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. निवडीबद्दल आमदार राहुल कुल, भाजप नेते प्रदीपदादा कंद, रोहिदास उंद्रे,संदीप भोंडवे, किरण दगडे, संदीप सातव,प्रदीप सातव पाटील,शरद आव्हाळे,गणेश सातव,विजय जाचक,शिवाजी गोते आदींनी अभिनंदन केले आहे.