नगर -निंबळक बायपास ते मनमाड बायपास रस्त्याच्या कामासाठी 21 कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. यावर्षी डिसेंबर अखेर हे काम पूूर्ण होईल. त्यातही एमआयडीसीला जोडणारा हा रस्ता असून, अत्यंत दर्जेदार काम होईल, यासाठी या रस्त्यावर विशेष लक्ष्य असेल, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
निंबळक बायपास ते मनमाड महामार्गापर्यंच्या रस्त्याच्या कामाची आमदार जगताप यांनी आज पहाणी केली. नगरसेवक कुमारसिंह वाकळे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, एमआयडीसीचे उपअभियंता गणेश वाघ, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, अशोक सोनवणे, दौलत शिंदे, हनुमंत कातोरे, विष्णू भोर, माजी नगरसेवक पोपट बारस्कर, ज्ञानदेव कापडे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
नगर एमआयडीसीतील उदयोग धंदयांना चालना मिळावी, यासाठी पाच वर्षे सरकारकडे पाठपुरावा करत आहे. एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास येथील उद्योगांना चालना मिळेल. शहराचा विकास औदयोगिक विकास झाला तर शहराचा विकास होईल. त्यासोबत नगरच्या एमआयडीसीत आणखी मोठे उदयोग यावेत, यासाठी सरकारकडेही पाठपुरावा सुरु असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी दिली.
एमआयडीसीती भागात “मॉडेल’ रस्ता म्हणून याकडे पाहता येईल, असा रस्ता तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. रस्ता दुभाजक, फुटपाथ, स्ट्रीटलाईट व वृक्षारोपणाकडेही लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.