जळोची : बारामती तालुका पोलीस ठाण्यात बुलेट गाडी अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद दाखल होती. सुरेश बचाराम बिबे (रा.शिर्सुफळ ता.बारामती जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली होती.
दाखल फिर्यादीनुसार गोपनीय माहितीच्या आधारावरून गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व त्यांच्या पथकाने चोरीला गेलेली बुलेट गाडी क्रमांक ( एम.एच १६ बी.जी ४८४८) आरोपी रोहित अजित भंडलकर (रा.लक्ष्मी नगर,फलटण.जि.सातारा) याच्याकडून हस्तगत केली असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीवर तालुका पोलीस ठाण्यात यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच सदर आरोपीवर बारामती शहर पोलीस ठाण्यात पोक्सो ,ॲट्रॉसिटीसह विविध गुन्ह्यात गेली पाच महिन्यापासून फरार होता.
सदर कामगिरी पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाचे सपोनि लंगुटे, पोलीस हवालदार दत्ता कुंभार ,पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव ,विनोद लोखंडे यांनी केली आहे.