एप्रिलमध्ये इंधन विक्रीत झाली 7 टक्के घट

नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात विविध राज्यांनी जे निर्बंध लागू केले आहेत त्यामुळे अनेक ठिकाणचे व्यवहार व वाहतूक थंडावल्यामुळे एप्रिल महिन्यात देशातील एकूण इंधन विक्रीत सुमारे सात टक्के इतकी घट नोंदवली गेली आहे.

भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे मार्केटिंग संचालक अरूण सिंग यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की मोटारसायकल आणि मोटार कारसाठी वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलच्या विक्रीत एप्रिल महिन्यात 2.14 दशलक्ष टन इतकी घट झाली आहे.

गेल्या ऑगस्टपासूनची ही सर्वात कमी विक्री आहे. मार्च 2021 च्या तुलनेत एप्रिल 2021 मधील पेट्रोल विक्रीची घट 6.3 टक्के इतकी नोंदवली गेली आहे.

या एप्रिल महिन्यात डिझेलची मागणीही 5.9 दशलक्ष टनाने घटली आहे. विमानासाठीच्या इंधन विक्रीतही इतक्‍याच मोठ्या प्रमाणात घट नोंदवली गेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.