पिंपरी, दि.21 – बॅंक मॅनेजर बोलत असल्याचे भसावत एका भामट्याने ऑनलाईन पद्धतीने एका नागरिकाच्या बॅंक खात्यामधून सर्व रक्कम चोरली. शिवाय परस्पर संबंधित बॅंक खात्यावर दोन लाखांचे कर्ज काढत नागरिकाची सव्वा दोन लाखाचे फसवणूक केली. हा प्रकार 27 फेब्रुवारी 2022 रोजी भोसरी येथे घडला होता.याप्रकऱणी कृष्णा बालाजी रोडगे (वय 34 रा.भोसरी) यांनी सोमवारी (दि.20) भोसरी पीस ठाण्यात फिर्याद दिली असून 9339537291 या मोबाईल क्रमांक धारकावर गुनहा दाखल कऱण्यात आला आहे.
फिर्यादी यांना आरोपीने वरील मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत मी आयसीआयसी आय बॅंकेत मॅनेजर असल्याचे भासवले. त्याने इएमआय बाबतची शंका दूर कऱण्यास फोन केल्याचे सांगितले. तसेच फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना एनी डेस्क नामाचे स्क्रीन शेअरिंगचे ऍप डाऊनलोड करायला लावले. त्यानंतर फिर्यादी यांच्या बॅंक खात्यातून 24 हजार रुपये काढून घेतले व त्याच खात्यावरपरस्पर 2 लाख रुपयांचे कर्ज घेत फिर्यादी यांची 2 लाख 24 हजार रुपयाची फसणूक केली आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.