पिंपरी -शहरात बुधवारी (दि. 29) ओमायक्रॉनचे नवे 4 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 2 महिला, 1 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. जपान, दक्षिण आफ्रिका आणि थायलंड येथुन आलेल्या प्रत्येकी एकाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. तर, 1 रुग्ण रॅन्डम तपासणीत ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे.
नवीन भोसरी रुग्णालयात संबंधित रुग्णांना उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. महापालिकेकडून आत्तापर्यंत परदेशातून आलेले नागरिक आणि त्यांच्या संपर्कातील अशा एकूण 1 हजार 539 जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे.
त्यापैकी 1 हजार 444 जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 1 हजार 387 रुग्ण निगेटिव्ह आढळले आहेत. तर, 31 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या संपर्कात आलेल्या 26 जणांनाही करोनाची लागण झाली.
31 बाधित रुग्णांपैकी 13 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. तर, संपर्कातील 26 जणांपैकी 9 ओमायक्रॉन बाधित आढळले. 1 रुग्ण रॅन्डम ओमायक्रॉन बाधित आढळला. 13 रुग्ण हे ओमायक्रॉनपासून मुक्त झाले आहेत. एकूण 58 कोविड बाधित रुग्णांपैकी 42 रुग्णांची पुन्हा दहाव्या दिवशी कोविड चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या रुग्णांना घरी सोडले आहे. तसेच, त्यांना गृह विलगीकरणात ठेवले आहे.