पिंपरी – मावळचे माजी खासदार गजानन बाबर यांची प्रकृती चिंताजनक आहे. बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोटाच्या विकारामुळे त्यांना सुरुवातीला चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बाणेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन गजानन बाबर यांच्या नातेवाईकांनी केले आहे.