T20 World Cup 2024 (Super 8) : पहिल्या सामन्यात टीम इंडियासमोर अफगाणिस्तानचे आव्हान, ‘या’ दिवशी रंगणार लढत…

बार्बाडोस – भारताचा सुपर-8 टप्प्यातील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध(२० जून) होणार आहे. भारताने अफगाणिस्तानविरुद्ध 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, फक्त एक सामना अनिर्णित राहिला, तर टीम इंडियाने 7 सामने जिंकले आहेत. दोघांमधील शेवटचा टी-२० सामना बंगळुरूमध्ये खेळला गेला होता. ज्यात भारताने 212 धावा केल्या, पण अफगाणिस्ताननेही 212 धावा करत सामना बरोबरीत सोडवला. ज्यामुळे सुपर-ओव्हरने सामन्याचा निर्णय झाला, पण इथेही स्कोअर बरोबरीचा राहिला. भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पुन्हा जास्त धावा केल्या आणि सामना जिंकला होता.
T20 World Cup 2024 (IND vs CAN) : भारत-कॅनडा लढतीत पावसानं मारली बाजी, नाणेफेक ‘न’ होता सामना रद्द…
टी-20 विश्वकरंडकात भारत-अफगाण संघ 3 वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने तिन्ही सामने जिंकले. 2010 मध्ये वेस्ट इंडिजच्या मैदानावर या स्पर्धेत दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर भारताने हा सामना 7 विकेटने जिंकला. 2012 मध्ये कोलंबोमध्ये दोघेही भिडले होते, येथे भारताने 23 धावांनी विजय मिळवला होता. 2021 मध्ये अबू धाबीच्या मैदानावर दोघांची अखेरची टक्कर झाली होती. येथेही भारताने ६६ धावांनी विजय मिळवला.
अँटिग्वात बांगलादेशशी भिडणार?
सुपर-8 मधील भारताचा दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध अँटिग्वा येथे खेळवला जाऊ शकतो. भारताने बांगलादेशविरुद्ध 13 टी-20 सामने खेळताना 12 जिंकले आहेत आणि बांगलादेशने फक्त एक जिंकला आहे. 2019 मध्ये दिल्लीच्या मैदानावर हा पराभव 7 विकेटने झाला होता. या दोघांमधील शेवटचा टी-20 आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळला गेला होता, जो भाटरताने 9 गडी राखून जिंकला होता.
ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान
सुपर-8 मधील भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना सेंट लुसिया येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सावध राहावे लागणार आहे, कारण भारत या संघाकडून टी-20 आंतरराष्ट्रीय आणि विश्वकरंडक या दोन्ही स्पर्धांमध्ये पराभूत झाला आहे. दोन्ही संघांमध्ये 31 टी-20 सामने खेळले गेले, भारताने 19 आणि ऑस्ट्रेलियाने 11 जिंकले. एक सामनाही अनिर्णित राहिला. दोन्ही संघांमध्ये बंगळुरूमध्ये झालेला शेवटचा सामनाही भारताने ६ धावांनी जिंकला होता.





