24 तासांत 62 जणांना संसर्ग ः बाधितांची संख्या 1670
राजगुरूनगर – खेड तालुक्यात 24 तासांत पाच व्यक्तीचा करोना उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तालुक्यात नव्याने 62 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यातील बाधित व्यक्तींची संख्या 1670 झाली आहे, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
म्हाळुंगे येथील 65 वर्षीय गृहस्थ, रौंधळवाडी येथील 70 वर्षीय महिला, वाडा येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चाकण येथील 50 वर्षीय ठेकेदार, आळंदी येथील 60 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाले आहेत. तालुक्यात मृतांची संख्या 42 वर गेली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमधील करोना बाधित व्यक्तींची संख्या 981 झाली असून, त्यापैकी 710 व्यक्ती उपचारानंतर बऱ्या झाल्या आहेत. 21 व्यक्तींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
चाकण नगर परिषद हद्दीत सर्वाधिक 352 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या असून 240 व्यक्ती उपचारानंतर बऱ्या झाल्या असून 12 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आळंदी नगरपरिषद हद्दीत 166 व्यक्ती आतापर्यंत पॉझिटिव्ह सापडल्या असून 112 व्यक्ती उपचारानंतर बऱ्या झाल्या आहेत. सहा व्यक्तींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीत आतापर्यंत 171 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या असून 137 व्यक्ती उपचारानंतर बऱ्या झाल्या आहेत. 3 व्यक्तीचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
खेड तालुक्यात मागील 24 तासांत चाकण 11, आळंदी 9, राजगुरूनगर 6 अशा तीन नगर परिषदांमिळून 26 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील राक्षेवाडी 1, तुकईवाडी 1, शेलपिंपळ्गाव 5, केळगाव 2, रासे 2, सोळू 5, निघोजे 2, म्हाळुंगे 1, सांगुर्डी 1, खराबवाडी 12, येलवडी 1, मेदनकरवाडी 1, निमगाव 2 या 13 गावात एकूण 36 व्यक्ती कारोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.
- खेड तालुक्याची करोना विषाणू संसर्ग आकडेवारी
तपशील.. एकूण बाधित व्यक्ती.. करोनामुक्त व्यक्ती .. मृत्यूची संख्या.. उपचार घेत असलेल्या व्यक्ती .. 24 तासात बाधित व्यक्ती
ग्रामीण क्षेत्र.. 981.. 710.. 21.. 250.. 36
चाकण नगरपरिषद.. 352.. 248.. 12.. 92.. 11
आळंदी नगरपरिषद.. 166.. 112.. 6.. 48.. 9
राजगुरूनगर नगरपरिषद.. 171.. 137.. 3.. 31.. 6
एकूण.. 1670.. 1207.. 42.. 421.. 62