4252 क्यूसेसने नीरा नदीत विसर्ग सुरू
भोर – भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यातील नीरा-देवघर धरण 100 टक्के भरले आहे. धरणाच्या सात पैकी पाच दरवाजांतून 4252 क्युसेकने नीरा नदीत विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती प्रकल्पाचे शाखा अभियंता परमानंद गोसावी यांनी दिली.
धरण 11.88 टीएमसी पाणी साठवाण क्षमतेचे असून, जून महिन्यापासून आतापर्यंत धरण परिसरात 1650 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण 100 टक्के भरल्याने धरण प्रकल्पाचे उपअभियंता अशोक चव्हाण यांच्या हस्ते जलाशयाला साडी-चोळी, हार, नारळ अर्पण करून जलपूजन करण्यात आले. यावेळी प्रकल्पाचे शाखा अभियंता अनिल नलावडे, तंत्रज्ञ लोखंडे यांसह कर्मचारी उपस्थित होते.