FIDE Candidates Chess Tournament 2024 :- ग्रँडमास्टर डी. गुकेशने येथे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत अमेरिकेच्या अव्वल मानांकित फॅबियानो कारुआनाला बरोबरीत रोखले, परंतु विदित गुजरातीला रशियाच्या इयान नेपोम्नियाचीविरुद्ध आणखी एक पराभव स्वीकारावा लागला.
दुसरीकडे, आर. प्रज्ञानंदने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत बरोबरी साधली तर अझरबैजानच्या निजात अब्बासोव्ह आणि फ्रान्सच्या फिरोझा अलीरेझा यांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांसह बरोबरी साधली. आठ खेळाडूंची ही दुहेरी राऊंड रॉबिन स्पर्धा पुढील जागतिक स्पर्धेसाठी चॅलेंजर ठरवणार आहे.
सध्या नेपोम्नियाची हा आघाडीवर असून कारुआना आणि गुकेश अडीच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर प्रज्ञानंद दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे तर विदित, अब्बासोव्ह, अलिरेझा आणि नाकामुरा हे सर्व दीड गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत.