मुंबई – मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय आणि बोल्ड विथ ब्युटी चेहरा म्हणजे अभिनेत्री ‘अभिज्ञा भावे’. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत मोनिका ही निगेटिव्ह शेडची भूमिका वठवणारी अभिज्ञा भावे. या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली.
मात्र, अभिज्ञाला ‘तुला पाहते रे’ या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेव्यतिरिक्त ती अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये झळकली आहे. सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असणाऱ्या अभिज्ञा भावेने आपल्या हटके स्टाईल आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
कोणतीही नवीन फॅशन किंवा ट्रेंड ती अगदी सहजरित्या फॉलो करतो. विशेष म्हणजे केवळ फॉलोच करते असं नाही तर तो सुंदररित्या कॅरीही करते. यात अनेकदा ती तिचे काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
View this post on Instagram
अलिकडेच अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे यात ती बिकिनीमध्ये दिसून येत आहे. या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची Floral print असलेली बिकिनी परिधान केली आहे. सोबतच एक छान स्माईल देत फोटोसाठी पोझ दिली आहे.
तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला असून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. बिकिनी लूक मध्ये अभिज्ञा प्रचंड हॉट दिसत असून, फॅन्स तर अक्षरशः घायाळ झाले आहेत.