नवी दिल्ली – क्रिस्टियानो रोनाल्डो आणि कोका-कोला वादाला एक वेगळा अँगल देऊन फेविकॉलने त्याचा वापर आपल्या जाहिरातीसाठी केला आहे. फेविकॉल ब्रँडने वादाचा वापर करून एक मजेदार जाहीरात तयार केलीय. फेविकॉलने ट्विटरवर ही जाहिरात शेअर केली असून ती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या जाहिरातीच्या ट्विटने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर 21,000 पेक्षा जास्त ‘लाईक्स’ मिळविल्या आहेत आणि लोकं ब्रँडच्या मार्केटींग पध्दतीची प्रशंसा करीत आहेत.
फेविकॉलच्या जाहिरातीमध्ये दोन Adhesive बॉटल फोटोशॉप करुन प्रेस कॉन्फरन्स टेबलवर ठेवल्या आहेत. त्याचवेळी, जाहिरातीसह कॅप्शनमध्ये ‘ना बॉटल हलणार, नाही मूल्यांकन घसरणार’ असे लिहिले आहे. तसेच, ‘हाय नी मेरा कोका कोका कोका कोका’ लिहून त्यांनी कोका-कोला कंपनीला लक्ष केलं आहे.
Haye ni mera Coka Coka Coka Coka Coka#Euro2020 #Ronaldo #MazbootJod #FevicolKaJod pic.twitter.com/lv6YWrgfxB
— Fevicol (@StuckByFevicol) June 17, 2021
नुकत्याच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोने कोका कोलाच्या दोन बॉटल टेबलवरुन बाजूला ठेवत पाण्याची बोटल समोर ठेवली. या कृतीमुळे रोनिल्डोची पत्रकार परिषद संपण्याच्या अगोदर कोका कोलाचे शेअर $56.10 वरुन $55.22 पर्यंत खाली आले. यात कंपनीला सुमारे 400 कोटी रुपयांचा फटका बसला. या घटनेनंतर लोकांनी रोनाल्डोच्या कोका कोला स्नॅप वर मिम्स बनवण्यास सुरूवात केली. यात आता फेविकॉलचा समावेश झालाय.
फेविकॉलच्या या मजेदार जाहिरातीचे नेटकरी कौतुक करीत आहेत. उद्योगपती हर्ष गोएंका यांनीही यावर भाष्य केले असून, ‘शानदार मार्केटींग’ म्हणत त्यांनी त्या जाहीरातीचे ट्वीट केले आहे. त्याचवेळी, एका वापरकर्त्याने लिहिलंय की ‘फेविकॉलच्या जाहिराती 2 दशकांहून अधिक काळ सातत्याने नेत्रदीपक आहेत’. खरं तर, फेविकॉलने आपल्या सर्जनशील जाहिरात मोहिमेद्वारे भारतीयांच्या अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले आहे.
Time is an illusion, timing is an art – brilliant marketing by Fevicol! pic.twitter.com/aLzwAjaLWp
— Harsh Goenka (@hvgoenka) June 17, 2021
दरम्यान, या घटनेमुळे एका नव्या प्रश्नाला वाचा फुटली आहे. यापुढे खेळाडूंसमोर या बाटल्या ठेवायच्या की नाही असा प्रश्न कंपन्यांसमोर निर्माण झाला असून खेळाडूंच्या या कृतीमुळे त्यांच्या व्यवसायावरच पाणी पडले आहे. रोनाल्डोचाच कित्ता गिरवत फ्रान्सचा मिडफिल्डर पाॅल पोगबाने देखील त्याच्या समोर ठेवलेली मद्याची बाटली हटवली. तसेच इटलीचा अव्वल खेळाडू मॅन्युएल लोकोटेलीने देखील हीच कृती केली.