जुलै महिन्यात अजय देवगण त्याच्या डिजीटल प्लॅटफॉर्मवरच्या पहिल्या “रुद्र’ च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. “ल्युथर’ या ब्रिटिश सिरीजचा हा हिंदी रिमेक आहे. अजय देवगण दोन महिन्यात याचे शूटिंग संपवणार आहे.
यासाठी अजय देवगणला तब्बल 125 कोटींचे मानधन देण्यात येणार आहे, असे समजले आहे. ही सिरीज हॉटस्टारवर रिलीज केला जाणार आहे. गेल्या 5 वर्षांपासून डिजीटल एंटरटेनमेंटमध्ये सक्रिय असलेल्या हॉटस्टारवर अजयचा विषय असल्यामुळेच अजयने हा डिजीटल प्लॅटफॉर्म निवडला आहे.
डिजीटल पदार्पणासाठी त्याला विचारले गेल्यावर त्याने लगेचच होकार दिला होता. “तान्हजी’ मुळे यशाच्या शिखरावर असलेल्या अजय देवगणने प्रथमच एवढ्या प्रचंड मानधनाची मागणी केली आणि ते लगेचच मान्यही करण्यात आले होते.
यामुळे तो हृतिक रोशन आणि अक्षय कुमार यांच्याबरोबर ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. “रूद्र’च्या प्रत्येक एपिसोडसाठी तो 2 कोटी रुपये घेणार आहे.
हृतिक आणि अक्षयनेदेखील आपल्या डिजीटल पदार्पणाच्यावेळी हेच समिकरण अवलंबले होते. हे तिघेही “ए” ऍक्टर डिजीटल प्लॅटफॉर्मवरचे सध्याच्या घडीचे सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत.