पुणे – भरधाव ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस-वेवर ताजे गावाजवळ ही घटना घडली असून यामध्ये ट्रक चालक जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी सोमटणे येथील पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक पुढे जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक भीषण होती की कंटेनर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आडवा झाला. यामध्ये ट्रक चालक जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस तात्काळ घटना स्थळी दाखल झाले असून महामार्ग पोलीस देवदूत यंत्रणेच्या साहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही गाड्या बाजूला करण्यात आल्या आहेत.
या अपघातामुळे एक्सप्रेस वेवर मोठ्या मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लाबंच लांब रांगा लागल्या आहेत. जवळपास दोन तासांनतर मुंबईकडे जाणारी वाहतूक आता सुरु झाली आहे.