श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची पक्षाच्या शिष्टमंडळाने रविवारी येथील निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळानेत्यांचे पुत्र ओमर अब्दुला यांचीही हरी हाउसमध्ये जाऊन भेट घेतली.
फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे कुटुंबीय दोन महिन्यांपासून नजरकैदेत आहेत. दोन्ही नेते ठीक आहेत., याचा आनंद असला तरी राज्यावर केलेल्या कारवाईमुळे ते दुःखी आहेत. भेट घेणाऱ्या नेत्यांत हसनैन मसूदी आणि अकबर लोण हेयांचा समवेश होता. माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांचे छायाचित्र फोटो तब्बल दोन महिन्यांनि दिसले. यात त्यांची पत्नीही आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्यात आलं. तेव्हापासून राज्यातले इतरही अनेक नेते नजरकैदेत आहेत. यात पिपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती आणि तसंच फारूख आणि उमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे. राज्यात संचारबंदीही अजून लागू आहे. मात्र, काही ठिकाणी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. तसंच राज्याचा कारभार आता राज्यपालांच्या हातात आहे.