Farmers Bonus । पीएम किसान सन्मान निधीनंतर आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 12 मार्च रोजी छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 13000 कोटी रुपये हस्तांतरित केले जातील. कृषक उन्नती योजनेंतर्गत धानाची फरकाची रक्कम 12 मार्च रोजी शेतकऱ्यांना हस्तांतरित केली जाणार आहे.
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी ‘X’ (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. विष्णू सरकारचा इरादा पक्का असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करणार. ‘कृषक उन्नती’ योजनेतून शेतकरी समाज समृद्ध होईल.
ही रक्कम 12 मार्च रोजी राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. 917 रुपये प्रति क्विंटल धानाच्या फरकाची रक्कम हस्तांतरित केली जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीसह एकूण 3100 रुपये प्रति क्विंटल मिळणार आहे.
राज्य सरकारच्या या योजनेचा छत्तीसगडमधील 24 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 13,000 कोटी रुपयांची फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल. । Farmers Bonus
राज्यातील भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना बोनस देण्याचे सांगितले होते. तूर्तास, सरकार आपले आश्वासन पूर्ण करणार आहे. हे वचन पूर्ण करण्यासाठी,
छत्तीसगड सरकारने चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात कृषक उन्नती योजनेसाठी 10 हजार कोटी रुपयांची आणि गेल्या वर्षीच्या पुरवणी बजेटमध्ये 3 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, यंदाच्या खरीप हंगामात 144.92 लाख मेट्रिक टन आधारभूत किंमतीवर खरेदी करण्यात आली आहे. हा आत्तापर्यंतचा उच्चांक आहे. या खरेदीच्या बदल्यात राज्य सरकार शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित करणार आहे. । Farmers Bonus