नवी दिल्ली – राज्यसभेतून आज पाच सदस्य निवृत्त झाले. त्यांना आज सभागृहात निरोप देण्यात आला. राज्यसभेने शुक्रवारी 18 ऑगस्ट रोजी निवृत्त होणारे भाजप नेते जुगलसिंह लोखंडवाला (भाजप) यांच्यासह पाच सदस्यांना निरोप दिला आणि सभागृहातील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. निवृत्त होणाऱ्या नऊ सदस्यांपैकी चार पुन्हा निवडून आले असून, इतर पाच सदस्यांना सभागृहाची उणीव भासणार आहे, असे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी सांगितले.
भाजपचे एस जयशंकर आणि सुखेंदू शेखर रे, तृणमुल कॉंग्रेसचे डेरेक ओ ब्रायन आणि डोला सेन हे चार सदस्य वरच्या सभागृहात पुन्हा निवडून आले आहेत तर पाच निवृत्त सदस्यांमध्ये भाजपचे जुगलसिंह लोखंडवाला,दिनेशचंद्र जेमलभाई अनावडिया, सुष्मिता, प्रदीप भट्टाचार्य. यांचा समावेश आहे.
निवृत्त होणाऱ्या पाच सदस्यांनी त्यांच्या कार्यकाळात सभागृहाच्या कामकाजात भरीव आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मला खात्री आहे की ते मोठ्या प्रमाणावर देशासाठी त्यांचे योगदान चालू ठेवतील. असे धनखर म्हणाले.