मुंबई – अभिनेत्री ‘मालविका मोहनन’ हिने बियॉन्ड द क्लाउड्स या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपट पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मालविका आज आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत गणली जाते. बियॉन्ड द क्लाउड्स या सिनेमात अभिनेता इशान खट्टरबरोबर ती मूख्य भूमिकेत होती. तिचा अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता.
मालविका मलयाळम सिनेमांमध्ये देखील झळकली आहे. मालविका फिल्मी फमिली बॅकग्राउंडची आहे. तिचे वडील सिनेमॅटोग्राफर असून त्यांनी फुकरे, तलाश, हम दिल दे चुके सनम यांसारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून मालविका नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. फॅन्सला देखील अभिनेत्रीचा अनोखा अंदाज आवडतो. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या मालविकानं आपल्या बोल्ड अँड ग्लॅमरस अंदाजाने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
नुकतंच, मालविका मोहनने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, त्यात ती अतिशय मादक आणि ग्लॅमरस दिसत आहे. यात तिने काळ्या रंगाचा जिम आऊटफिट परिधान केला असून, यामध्ये तिची करवी फिगर प्रेक्षकांना स्वतःकडे खेचून घेत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
तसेच मालविकाचा बोल्ड अंदाज यातून दिसून येत आहे. अभिनेत्रीला वर्क आउट आणि योगा करणे प्रचंड आवडते. मालविका नेहमीच आपले जिम मधील फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. तिचे सर्वच फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.