– श्वेता अक्षय ढोरे
कोणत्याही क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी मुलाखत देणे हि एक अनिवार्य प्रक्रिया(Mandatory Process)आहे. आपल्याला वाटते तितकी सोपी नसते मुलाखत. भरती प्रक्रियेमध्ये काय करायला हवे आणि काय नको हे माहित असणे तितकेच महत्वाचे आहे जितके एखाद्याचा संदर्भ (reference) देणे किंवा strong resume असणे होय. कधीकधी मुलाखत हि एकदम सहज सोपी होऊन जाते पण तज्ञ हे तुमच्या चुका काढायला नेहमी तयार असतात. त्यामुळे मुलाखतीला जाताना खालील गोष्टींचा विचार करून त्या चुका टाळा. मला खात्री आहे या चुका टाळल्यानंतर नक्की तुम्ही यशस्वी मुलाखत देऊन आपल्या स्वप्नांना गवसणी घालू शकता. विजयी भव!
१. अपूर्ण तयारी (Failing to prepare)
तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये आणि कोणत्या पदासाठी मुलाखत देत आहात त्याबद्दलची सर्व माहिती काढून त्यावर अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यानुसार तुम्ही तुमची कौशल्ये कंपनीसाठी कशी हितकारक आहेत हे आत्मविश्वासाने सांगू शकता.
२.अयोग्य पेहराव(Inapproapriate dressing)
पुस्तकाच्या आवरणावरून पुस्तकाची किंमत ठरवणे अयोग्य आहे हे आपण जाणून आहोत पण मुलाखत घेणारे बऱ्याचदा हेच करतात.त्यामुळे तुम्ही मुलाखतीला जाताना प्रोफेशनल दिसणे महत्वाचे आहे. जर तुमचा पेहराव खूपच इनफॉर्मल असेल तर तुम्ही स्वतःची ओळख करून देण्याआधीच तुमचा वाईट प्रभाव पडेल.
३. उशिरा पोहोचणे (Arriving late)
नोकरी मिळविण्यासाठी फर्स्ट इम्प्रेशन हेच लास्ट इम्प्रेशन असते. जर तुम्ही मुलाखतीसाठी उशिरा पोहोचलात तर त्यातून तुमच्यामध्ये वेळेचे नियोजन करण्याच्या कौशल्याचा अभाव असल्याचे दिसून येते तसेच तुम्हाला त्या कंपनीबद्दल व पदाबद्दल आदर नसल्याचे जाणवते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर निघा जेणेकरून तुम्ही मुलाखतीच्या वेळेआधी १० मिनिटे जागेवर पोहोचताल. यातून हे निदर्शनास येते कि तुम्ही कीती शिस्तबद्ध आणि ऑर्गनाईजड आहात.
४.मोबईल वापरणे (Using Mobile)
मुलाखतीला जाण्यापूर्वी तुमचा फोन silent करा किंवा बंद करा. मुलाखतीदरम्यान फोन वापरणे हे असभ्यपणाचे लक्षण असून त्यातून असे निष्पन्न होते कि तुम्ही या पदासाठी योग्य उमेदवार नाहीत व तुम्हाला या नोकरीची गरज नाही. तुम्ही वेळ बघण्याकरिता जरी फोन बघितला तरी त्याचा वाईट प्रभाव पडतो.
५.अनाकर्षक resume
resume हा तुमच्या आधी मुलाखत घेणार्याकडे पोहोचलेला असतो त्यामुळे तो स्पष्ट, संक्षिप्त आणि आकर्षक असणे गरजेचे आहे. resume हा तुमची कौशल्ये, आवड आणि अनुभव दर्शवणारा आरसा असतो. त्यामुळे त्याला तुमच्यातील प्रतिभा, गुणवत्ता, अनुभव आणि थोडीफार स्वतःची माहिती याने सजवणे गरजेचे आहे. resume मधील खोटी माहिती वाईट प्रभाव पडू शकते.
६.अयोग्य body language
तुमची body language तुमचे व्यक्तिमत्व दर्शवते. आपल्याला माहिती आहे कि संवाद हा शब्दांपलीकडेही असतो त्यामुळे मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी हात मिळवणे आणि योग्य स्थितीत बसणे गरजेचे आहे. मुलाखतीदरम्यान बोलताना आणि ऐकताना eye contact ठेवणे जरुरी आहे.
७.लक्ष न देणे
तुमचे लक्ष विचलित होणे किंवा एखादा प्रश्न विसरणे हे दुर्लक्षण आहे. मुलाखतीदरम्यान स्वतःला विचलित होऊन देऊ नका. तुम्ही सतर्क आहात आणि मुलाखतीसाठी तुमची पूर्ण तयारी झाली आहे याची खात्री करा. जर तुम्हाला असे वाटत असल कि तुमचे लक्ष विचलित होत आहे तर त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐका व eye contact ठेवा.
८. खोटे बोलू नका
मुलाखत घेणाऱ्याला तुम्ही संपूर्ण खरी आणि विश्वास ठेवण्याजोगी माहिती दिली पाहिजे. खोटे बोलण्याची युक्ती हि चुकीची आहे. जेव्हा कंपनीला तुमच्या खरेपणाबद्दल कळेल तेव्हा तुम्हाला ताबडतोब कामावरून काढले जाऊ शकते आणि याचा परिणाम तुमच्या भविष्यातील संधींवरहि होईल.
९. उद्धटपणाने वागणे
मुलाखतीदरम्यान प्रत्येकावर चांगला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करा, कारण भरती प्रक्रियेमध्ये कोणाचे मत घेतले जाऊ शकते याबद्दल तुम्हाला माहिती नसते. कंपनीला अशा उमेदवाराची गरज असते जो एका टीमसोबत काम करेल आणि जर तुम्ही उद्धटपणे वागलात तर ते तुमची निवड करणार नाहीत.