अवसरी, (वार्ताहर) – गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन, अटल बिहारी वाजपेयी विचार मंच, आंबेगाव तालुका भाजपा व अटल वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ७० नागरिकांची डोळेतपासणी करण्यात आली.
या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन सरपंच विजय गावडे व भाजप तालुकाध्यक्ष संदीप बाणखेले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संतोष गावडे, एकनाथ गावडे, शिंदे महाराज, संतोष हिंगे, भाजप नेते उत्तम शिंदे, स्वप्निल इंदोरे, अंकुश महाराज चौरे उपस्थित होते. भाजपा तालुकाध्यक्ष संदीप बाणखेले यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये ७० रुग्णांची तपासणी करण्यात आली. १० रुग्ण मोतीबिंदू आढळून आले. ५ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. आरोग्य दूत सुशांत थोरात यांनी कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक केले. डोळे फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र कानडे यांनी आभार मानले.