बिबवेवाडी, दि. 7 – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सेवा सप्ताह उपक्रम अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यात नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्प दरात चष्मे वाटप उपक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. स्वप्नपूर्ती सोसायटी हॉल मार्केट यार्ड येथे हे शिबिर झाले.
यावेळी 130 नागरिकांनी डोळे तपासणी केली. तसेच मोतीबिंदू ऑपरेशन करिता 10 नागरिकांनी आपली नावे नोंदविलेली आहेत. त्यांचे पवार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून गरजूवंत नागरिकांना फायदा होत आहे. दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कुटुंबाच्या नावाने वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्यात आले. आधारकार्ड दुरुस्ती, ई श्रम कार्ड वाटप, बंद पडलेले रेशनिंग कार्ड सुरू करणे. इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे व सदस्य शोभा नांगरे यांनी केले. यावेळी विशाल केकाने, योगेश पवार, संजय दामोदरे, राजाभाऊ कारंडे, विद्या ताकवले, वैशाली जाधव, वंदना दिघे, विकास थोपटे, सागर नांगरे आदी उपस्थित होते.