मौलानाकडून अल्पवयीन मुलांचे शोषण; सापडले 10 अश्‍लील व्हिडीओ

पाकिस्तानातील घटनेत दोघांना अटक

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात चकवाल जिल्ह्यातील ढोके फुलारी गावात मदरशात शिकणाऱ्या मुलींचंच लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी मौलानाने अल्पवयीन मुलींचे शोषण तर केलेच शिवाय व्हिडीओ देखील रेकॉर्ड केले असल्याची बातमी असल्यामुळे स्थानिकांत संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मागील 3 वर्षांपासून आरोपी मौलाना मदरशामधील मुलींचे शोषण करत होता. तसेच त्या मुलींचे व्हिडीओ देखील करत होता. शोषण झालेल्यांमध्ये 4 मुलींचा आणि एका मुलाचा समावेश आहे. आरोपीने आतापर्यंत हे सर्व इतरांपासून लपवून ठेवले. मात्र, या गुन्ह्यात त्याचा सहकारी असलेल्या अन्य आरोपीसोबत त्याचे भांडण झाले आणि हा प्रकार उघड झाला. या गुन्ह्यात सहकाऱ्याचाही सहभाग होता. मौलानासोबत वाद झाल्यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशन गाठत मौलानाची पोलखोल केली.

लैंगिक शोषण झालेल्या सर्वांचं वय 6 ते 12 वर्षांच्या दरम्यान आहे. त्याने पोलिसांना विश्वास व्हावा म्हणून व्हिडीओ देखील दाखवला. यानंतर पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी पीडित मुलांशी देखील चर्चा केली. मौलाना व्हिडीओ लिक करण्याची धमकी देत शोषण करायचा असेही आतापर्यंतच्या तपासात आढळून आले आहे.

सर्व पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पीडितांचे डीएनए नमुने देखील तपासणीसाठी फॉरेंसिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. आरोपीकडे 10 अश्‍लील व्हिडीओ सापडले आहेत. त्याशिवाय काही मेमरी कार्ड देखील जप्त करण्यात आलेत. यात अश्‍लील व्हिडीओ आहेत. त्या व्हिडीओंची देखील फॉरेंसिक तपासणी करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.