Acidity News – पित्ताच्या समस्येने ग्रासलेले अनेक जण आपल्या आजूबाजूला आढळतात. त्यापैकी प्रत्येकजण तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगतील. काही तुम्ही करुन थकला असाल, तर काही उपायांवर तुमचा विश्वास बसणार नाही. येथे आम्ही दोन वेगळेच उपाय सुचवत आहोत. एक आहे ‘नारळ पाणी‘ पिण्याचा आणि दुसरा आहे ‘व्हॅनिला आईस्क्रीम‘ खाण्याचा. कसे ठरते फायदेशीर ? नारळाचे पाणी प्यायल्यास शरीरातील ऍसिड घटकांचे अल्कलाईनमध्ये रुपांतर होण्यास मदत होते. परिणामी ऍसिडीटीचा त्रास शमवण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असल्याने पित्ताचा त्रास उलटण्याची शक्यता कमी होते. तसेच पोटात थंडावा निर्माण झाल्याने जळजळ कमी होण्यासही मदत होते. कसा कराल हा उपाय ? पित्ताचा त्रास रोखण्यासाठी जेवल्यानंतर अर्धातासाने ग्लासभर नारळाचे पाणी प्यावे. पोषणयुक्त आहारासोबत नियमित जेवणानंतर 2-3 महिने नारळ्याचे पाणी प्यायल्यास पित्ताचा त्रास कायमस्वरूपी आटोक्यात राहण्यास मदत होईल. सोबतच पचनही सुधारेल. असा सल्ला आहारतज्ञ देतात. पित्ताचा त्रास कमी करण्यासह त्वचेचे सौंदर्य सुधारण्यासही नारळ्याचे पाणी फायदेशीर आहे. सौंदर्य सुधारण्यासोबतच नारळाचे काही आरोग्यदायी फायदे देखील आहेत. व्हॅनिला आईस्क्रीम? अतिखाल्ल्याने ऍसिडीटी किंवा छातीत जळजळणे अशा समस्येचा त्रास होत असल्यास त्यावर सोपा उपाय म्हणजे ‘व्हॅनिला आईस्क्रिम’, हे आईस्क्रिम केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर त्यामागे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. व्हॅनिला आईस्क्रिम हा कोल्ड मिल्कचाच एक प्रकार आहे. यामुळे नैसर्गिकरित्या ऍसिडीटीचा त्रास कमी करण्यास फायदा होतो. vanilla cream कसे ठरते फायदेशीर ? काही अभ्यासाच्या अहवालानुसार दुग्धजन्य पदार्थांमुळे पित्त वाढू शकते. मात्र दूध हे पूर्णअन्न आणि नैसर्गिक ऍन्टासिड म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जेवणानंतर इतर काही गोडाचे पदार्थ खाल्यास ते फायदेशीर ठरत नाहीत. दूधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन घटकांचा मुबलक साठा असतो. दूधामुळे शरीरात ऍसिड साचून राहण्यास प्रतिबंध होतो. तसेच शरीरातील अतिरिक्त ऍसिड दूधात शोषले जाते. म्हणूनच जेवणानंतर कपभर व्हॅनिला आईस्क्रिम खाल्यास पचन सुधारते आणि छातीत होणार्या जळजळीपासून आराम मिळण्यास मदत होते. अन्न पोटात गेल्यानंतर डायजेस्टिव ज्युस (अन्नरस) पोषणद्रव्यांचे शोषण करण्यासाठी मदत करतात. अन्नाचे विघटन होऊन तयार होणारे रस ऍसिडीक असतात. ते पोटात राहणे आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र पचनप्रक्रियेमध्ये काही बिघाड झाल्यास ते पुन्हा तोंडाजवळ येतात. याल रिव्हर्स पेरिस्टाल्सिस असे म्हणतात. देखील वाचा… Healthy Tips : फळ की फळांचा रस? आरोग्यासाठी नेमकं काय जास्त फायदेशीर? हे ऍसिडीटीच्या लक्षणांमधून आपल्याला समजते. ही लक्षणं आढळल्यास आपण ऍन्टासिड्स घेतो. यापुढे ऍसिडीटीचा त्रास वाटल्यास गोळ्या किंवा सिरप घेण्यापेक्षा व्हॅनिला आईस्क्रिमचा आस्वाद घ्या. इतर आईस्क्रिमच्या तुलनेत व्हॅनिला आईस्क्रिममध्ये साखरेचे प्रमाण आटोक्यात असते. गर्भारपणाच्या दिवसात स्त्रियांना ऍसिडीटी किंवा हार्टबर्नचा त्रास होत असल्यास गर्भवती स्त्रियादेखील कपभर व्हॅनिला आईस्क्रिम खाऊ शकतात. व्हेनिला आईस्क्रिम हे घरगुती बनवलेले असल्यास तसेच त्यामध्ये आर्टिफिशिअल रंग, स्वादाचा अति वापर केलेले नसल्यास ते फायदेशीर ठरेल. Acidity ‘हे’ देखील आहे फायदेशीर ! केळी – केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबर शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते. पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो. तुळस – तुळशीमधील ऍन्टीअल्सर घटक पोटातील/जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते. तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर तुळशीची पाने चावून खा. दुध – दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबते व अतिरक्त आम्ल दुध खेचून त्याचे अस्तित्व संपवते. थंड दुध पिल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. दुध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे. मात्र त्यात चमचा भर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते. बडीशेप – बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास, बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो. जिरे – जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते , ज्यामुळे पचन सुधारते , मेटाबॉलीझम सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात. जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील आराम मिळतो. किंवा तुम्ही जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या. लवंग – लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते, पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते. लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा , त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या. या रसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते. वेलची – आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते . स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट/सालीशिवाय ) ती पाण्यात टाकून उकळा. हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल. पुदिना – पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो. पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होतअसल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्या. हे देखील वाचा… UGC News : मानसिक आरोग्यासाठी ‘यूजीसी’चे मोठे पाऊल; आता प्रत्येक १०० विद्यार्थ्यांमागे असेल एक ‘मानसोपचारतज्ज्ञ’ Devendra Fadanvis : जाधव समितीचा अहवाल सरकारकडे सादर; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती