Dainik Prabhat
Wednesday, June 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आरोग्य जागर

आता पित्तापासून मिळवा झटपट मुक्ती; ते पण एका क्लीक वर…

by प्रभात वृत्तसेवा
May 7, 2022 | 8:33 am
A A
आम्लपित्त्ताचा त्रास कमी करणारे पादस्पर्शासन

सध्या तापमानाचा पारा आता चढत आहे. प्रत्येकाने आपले आरोग्य आणि स्वास्थ्याबद्दल अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. जे विचार न करता खान-पान करतात, त्यांच्या आरोग्याला या मोसमात आव्हान निर्माण होतं. सर्वसाधारणपणे दाह आणि पित्त असे त्रास प्रामुख्याने उन्हाळ्यात होतात. छातीत जळजळ, मुखदुर्गंधी, तोंड येणं आणि दाह. शरीरात जेव्हा उष्णता वाढते तेव्हा आपलं शरीर उच्चतम पातळीवर आम्लनिर्मिती करतं. अशावेळी अन्नच तुमचे औषध ठरू शकते.

पाणी आणि द्रवपदार्थ – शरीरातील पाणी आणि पीएच पातळी सुयोग्य राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाणी, शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, थंड दूध, ताक आदी द्रवपदार्थ जास्त घेणे महत्त्वाचे आहे. शहाळ्यामुळे नैसर्गिक पद्धतीने मूत्रविसर्जनाचे प्रमाण वाढते. यात पोटॅशियम आणि खनिजांचा मोठया प्रमाणावर असल्यामुळे शरीरातून टॉक्‍सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.

थंड दूध – आहारात थंड दुधाच्या समावेशाने, पोटातील अतिरिक्‍त आम्ल शोषले जाते. थंड दुधात 1 चमचा सब्जा टक्‍कल्यास ते पित्तासाठी अतिशय उपायकारक ठरते.
दही आणि ताक – उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून प्रामुख्याने हे पदार्थ सुचवले जातातच. या दोन्ही घटकांमध्ये प्रोबायोटिक्‍स उत्तम प्रमाणात असल्याचे सर्वज्ञात आहे. पोटाचे संरक्षण आणि पचनक्रिया सुधारण्यास यामुळे मदत होते.

विविध फळे – फळं नैसर्गिक स्तरावर अँटीऑक्‍सिडंट आहेतच. शिवाय भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे ती ऊर्जा निर्मितीही करतात. पाण्याचा समावेश, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरयुक्‍त फळे सर्वोत्तम ठरतात आणि खास करून उन्हाळ्यात त्यांचा चांगलाच फायदा होतो. यामुळे फळांचा रस घेण्यापेक्षा उत्तम रसाळ फळ खावे.
आवळा, पेरू, संत्रा आणि लिंबू यासारखी फळे जीवनसत्वयुक्‍त आहेत. थोडीशी आंबट असल्याने, अनेकांना या फळांमुळे पित्त वाढेल, अशी भीती वाटते. परंतु, जीवनसत्वयुक्‍त असलेली ही फळे पित्तासाठी परिणामकारक ठरतात. शिवाय यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आंब्यासारखी उन्हाळ्यात मिळणारी फळेही जीवनसत्त्वाने परिपूर्ण आहेत. ताडगोळा, जाम, खरबूज, कलिंगड ही फळेसुद्धा पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहेत. या फळांमुळे शरीरात पाण्याची पातळी राखली जाते.

केळी हे फळ पित्तावर औषध म्हणून सर्वसाधारणपणे घरगुती उपायांमध्ये वापरले जाते. उत्तम फायबरच्या समावेशामुळे केळे पित्तमारक ठरते. मोसमी फळे तसेच विविध रंगांची फळे खावीत, असे आम्ही सुचवतो. यामुळे नैसर्गिकस्तरावर अँटीऑक्‍सिडंटचे फायदे मिळतात आणि शरीराची ऊर्जा क्षमताही वाढीस लागते.

भाज्या – दुधी, पडवळ, भोपळा, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्या त्यांच्यातील पाण्याचा आणि खनिजांच्या अंशामुळे फायदेशीर ठरतात. शरीराची पाण्याची पातळी राखण्यासाठी काकडी खासकरून उपयुक्त ठरते. सिमला मिरचीमुळेही नैसर्गिक स्तरावर पोटातील आम्लावर परिणाम होतो. उन्हाळ्यात खास करून वैविध्यपूर्ण सलाड आणि भाज्यांचे गार सूप अशा पदार्थाचा आहारात समावेश करावा.

गूळ – गूळ या मोसमासाठी चांगला असतो. गुळाचे पाणी तुमच्या पित्तावर आणि पित्ताच्या लक्षणांवर अतिशय परिणामकारक ठरते. चिमूटभर मीठ घातलेले, तुळशीची पाने असलेलं लिंबूपाणी घोट घोट घेत राहणं, ताजा ऊस खाणं यामुळेही शरीरातील वाढलेले तापमान कमी होत. चहा, कॉफी, मद्य, सोडा इत्यादींच्या अतिरिक्‍त सेवनामुळे पित्त वाढते आणि दाहसुद्धा होतो. लाल आणि हिरवी मिरची, मिरी यासारखे मसाले, पुदिना आणि चॉकलेट यामुळेही शरीरात आम्लनिर्मिती होते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्या जोडीला अतीगार पाणी पिणे, उन्हाळा आहे म्हणून रात्री अमर्याद जागरण करणे अथवा बाहेरचे मनसोक्त खाणे या गोष्टीही टाळल्या पाहिजेत. तरच पित्त प्रवृत्ती उफाळून येणार नाहीत.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedablood pressurecaronacholesterolcoffeecorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagartopnews

शिफारस केलेल्या बातम्या

जाणून घ्या… पाणी किती, कधी, कसे, प्यावे?
आरोग्य जागर

पाण्याचे शरीरातील महत्त्व

3 days ago
Women Health : महिलांनी ‘हे’ 7 पदार्थ चुकूनही खाऊ नये, नाही होणार आरोग्यावर गंभीर परिणाम
आरोग्य जागर

Women Health : महिलांनी ‘हे’ 7 पदार्थ चुकूनही खाऊ नये, नाही होणार आरोग्यावर गंभीर परिणाम

3 days ago
‘या’ महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका दुप्पट, तज्ज्ञांनी सांगितली ही गंभीर लक्षणे…!
आरोग्य जागर

‘या’ महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका दुप्पट, तज्ज्ञांनी सांगितली ही गंभीर लक्षणे…!

3 days ago
पार्किन्सन डिसीजवर नियंत्रण ठेवा
आरोग्य जागर

पार्किन्सन डिसीजवर नियंत्रण ठेवा

5 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत स्वागत

मविआ सरकार अल्पमतात! राज्यपालांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

राजकीय घडामोडीचा अंत समीप; भाजपकडून बहुमत चाचणीची राज्यपालांकडे मागणी

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजपचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीला

एका व्यक्तीच्या बढतीने संपूर्ण समुदायाचा विकास होत नाही; मुर्मू यांच्याबाबत यशवंत सिन्हांची भूमिका

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; चौघांचा मृत्यू

नुपूर शर्मांना पाठिंबा देणाऱ्या दुकानदाराची हत्या

राज्यात 7231 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या; मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा

Most Popular Today

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedablood pressurecaronacholesterolcoffeecorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagartopnews

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!