Remedies for Acidity: घरगुती उपायांनी मिळवा ऍसिडिटी वर त्वरित आराम

Remedies for Acidity: आजच्या धावपळीच्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे एसिडिटी ही एक सामान्य समस्या बनली आहे. तिखट-तेलकट अन्न, रात्री उशिरा जेवण किंवा जास्त ताण यामुळे ही समस्या उद्भवते. एसिडिटी झाल्यावर पोटात जळजळ, छातीत दुखणे आणि आंबट ढेकर या तक्रारी जाणवतात. ही अवस्था पचनावर परिणाम करून दिवसभर त्रासदायक ठरते. अशा वेळी काही घरगुती उपाय त्वरित आराम देऊ शकतात.
एसिडिटीवर उपाय
१. थंड दूध आणि केळं
थंड दूध पिल्याने पोटातील आम्ल (अॅसिड) कमी होते, कारण दुधातील कॅल्शियम त्याला निष्प्रभ करतं. केळीमध्ये नैसर्गिक एंटासिड गुणधर्म असतात, जे पोटातील जळजळ कमी करून पचन सुधारतात.
२. नारळपाणी आणि बडीशेप
नारळपाण्यातील इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील पीएच लेव्हल संतुलित ठेवतात आणि जळजळ कमी करतात. हे नैसर्गिक एंटासिड आहे. तसेच जेवणानंतर बडीशेप चघळल्यानेही पचन सुधारते आणि एसिडिटीपासून आराम मिळतो.
३. जिरे आणि ओव्याचं पाणी
जिरे उकळून त्याचं पाणी प्यायल्याने गॅस आणि एसिडिटी कमी होते. त्याचप्रमाणे ओवा थोडं पाण्यात उकळून किंवा काळं मीठ टाकून खाल्ल्यास त्वरित आराम मिळतो. हे दोन्ही उपाय पचनक्रियेला मदत करतात आणि पोटातील ताण कमी करतात.
जर एसिडिटी सतत होत असेल किंवा त्रास वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.





